


प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ६३० घरांचा भव्य आधुनिक जीवनशैलीने संपन्न असा गृह प्रकल्प.
पाचोरा सारख्या शहरामध्ये प्रथमच सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि (EWS) माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत आधुनिक जीवनशाहीला साजेसे असे स्वामी नारायण पार्क. सुंदर असे लँडस्केप गार्डन, मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा, मोकळ्या वातावरणात जेष्ठांना बसण्यासाठी फिरण्यासाठी तसेच विरंगुळा व्हावा या हेतूने केलेली प्रकल्पाची रचना हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ठ्ये आहेत.
अधिक माहिती वाचास्वामी लँड डेव्हलपर्स तसेच समर्थ इन्फ्रा हे पाचोरा, जळगाव भागातील बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय असे नाव. या माध्यमातून पाचोरा जळगाव येथे अनेक प्लॉटींग प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले याचा फायदा आजघडीला जवळपास चार हजारांच्यावर आनंदी ग्राहकांना झाला आहे, शिवाय समर्थ व्हॅली, समर्थ रेसिडेन्सी, समर्थ पार्क, समर्थ ड्रिम होम, समर्थ सृष्टी, समर्थ व्हिला, समर्थ क्लासिक यासारखे अनेक महत्वकांक्षी प्रकल्पाचा जवळपास चारशेच्या आसपास कुटुंबं लाभ घेत आहेत.
पाचोरा जळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबांचा स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून साकार करण्यासाठी स्वामी लँड डेव्हलपर्स तसेच समर्थ इन्फ्राचे श्री. मनीष दादा भोसले आणि श्री. सचिन कदम यांनी पुढाकार घेत पाचोरा सारख्या छोट्या शहरात न भूतो न भविष्यति भव्यदिव्य असा ६३० घरांचा प्रकल्प सुरु केला आहे.
आपल्या स्वप्नांना बळकटी देण्यासाठी, आपल्या गृहस्वप्न पूर्ततेसाठी आम्ही प्रयत्नशील तर आहोतच शिवाय बांधकाम क्षेत्रात अग्रेसर कामगिरी करून पाचोरा जळगाव या निमशहरी भागात आधुनिक राहणीमानाच्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
अनेक अपेक्षा तसेच स्वप्नांनी सजलेल्या आणि साकारलेल्या आपल्या घराच्या पूर्ततेसाठी आम्हीही तेवढ्याच आपुलकी, तन्मयता आणि कार्यक्षमतेने सज्ज आहोत. तुमच्या स्वप्नांतील हक्काचे घर सुपूर्त करताना आम्हाला देखील आपल्या एवढाच अभिमान असेल.